भुसावळचे रंगकर्मी रमाकांत भालेराव यांना कलादर्पण पुरस्कार

0
भुसावळ :- नुपूर कथ्थक डान्स अकॅडमीचे संचालक तसेच रंगकर्मी रमाकांत भालेराव यांना नीलिमा प्रॉडक्शन पुणे-बारामती यांच्या वतीने कलादर्पण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यता आले. कै.वसंतराव पवार नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात शंकराची मूर्ती, शाल व मानपत्र व पुणेरी पगडी देऊन सन्मान करण्यात आला. नीलिमा प्रॉडक्शनचे संचालक पराग हिरवे यांच्या हस्ते भालेराव यांनी सन्मान स्वीकारला.
यांचाही झाला सन्मान
यंदा हा पुरस्कार महाराष्ट्रातील दहा पुरुष नर्तकांना देण्यात आला. मयूर वैद्य (मुंबई), वैभव जोशी ,(मुंबई), योगेंद्र ओझे (पनवेल), रमाकांत भालेराव (भुसावळ), राजेश बोडे (अमरावती), रचित तिवारी (अकोला), हृदयनाथ चव्हाण (गडहिंग्लज), नितीन शिराळे (औरंगाबाद), मिलिंद घरडे (पुणे) यांना प्रदान करण्यात आला. प्रसंगी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे या अतिथि म्हणून उपस्थित होत्या.