भुसावळ : शहरातील आगवाली चाळ भागात घरावर दगड भिरकावल्याच्या निमित्ताने दोन गट समोरा-समोर भिडल्याने झालेल्या हाणामारीत दोन्ही गटाचे चौघे जखमी झाले तर सर्रास तलवार, लोखंडी पाईपासह लाकडी काठीचा वापर करण्यात आल्याने शहर पोलिसात 20 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना अटक करण्यात आली आहे. 19 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पहिल्या गटातर्फे नितीन प्रेमनाथ चावरीया (26, आगवाली चाळ) यांनी फिर्याद दिल्यावरून राजेंद्र अहिरे, रवी अहिरे, विशाल अहिरे, सनी अहिरेचे दोन पुतणे (नाव, गाव माहित नाही), मनोहर अहिरे, प्रशांत अहिरे, सुनीता अहिरे, स्नेहा अहिरे, कल्पना अहिरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार चावरीया यांच्या घरावर गिप्ट कागदचा खोका मारून फेकल्यानंतर जाब विचारण्यास गेल्यानंतर आरोपींनी लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेत नितीन चावरीया, कोमल नितीन चावरीया, जय टोजकर जखमी झाले.
दुसर्या गटाचीही तक्रार
दुसर्या गटातर्फे तुषार एकनाथ अहिरे (21, आगवाली चाळ) यांनी फिर्याद दिली. तक्रारदार अहिरे यांच्या घरावर संशयीत आरोपी चावरीया यांच्या मुलाने दगड भिरकावला व त्याचा जाब विचारण्यास गेल्यानंतर नितीन चावरीया, सोनी अहिरे, शुभम बारसे, मिलत वोकम, नायरा मड्डू, अन्नू मड्डू व अन्य चार अनोळखींनी तलवार, लोखंडी पाईपासह लोकडी दांड्याने मारहाण केली. त्यात एकनाथ सोमा अहिरे, शुभम एकनाथ अहिरे, राणू सोमा अहिरे, मनोहर सोमा अहिरे, कल्पना रमेश अहिरे, रुपाली राजेंद्र अहिरे जखमी झाले. तपास प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय फारूक शेख करीत आहेत.