भुसावळ- आयुर्वेद संशोधन सेवा मंडळातर्फे यंदाचा धन्वंतरी पुरस्कार शहरातील स्त्री रोग प्रसुती तज्ज्ञ डॉ.सुजाता केळकर यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण सोमवार, 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता नाहाटा महाविद्यालयामागील महेश नगरातील धन्वंतरी भवनात होणार आहे. धन्वंतरी जयंतीनिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून या कार्यक्रमास जळगाव येथील प्रख्यात स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.सुदर्शन नवाल अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख अतिथी म्हणून रावेर-यावल मतदार संघाचे आमदार हरीभाऊ जावळे उपस्थित राहतील. डॉ.सुजाता केळकर यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांची निवड करण्यात आली असून पुरस्काराचे स्वरूप सन्मान पत्र, शाल, श्रीफळ राहणार असल्याचे सुश्रृत जळूकर कळवतात.