भुसावळ- भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात 3 रोजी संगीत विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘राग सौंदर्य आणि रीयाजाच्या पद्धती’ या संगीत विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम कलाकार डॉ.विकास कशाळकर, पुणे मार्गदर्शन करतील. त्यांना तबला संगत माधव मोडक, पुणे तर संवादिनीवर शुभांगी भावसार, पुणे या संगत करतील. उद्घाटन सकाळी नऊ वाजता प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे करतील. कार्यशाळा दोन सत्रात होईल. प्रथम सत्रात सकाळी 9.30 ते एक दरम्यान ‘राग सौंदर्य’ या विषयावर तर व्दितीय सत्रात दुपारी दोन ते 4.30 यावेळेत ‘रीयाजाच्या पद्धती’ या विषयावर डॉ.विकास कशाळकर हे मार्गदर्शन करतील. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता डॉ.विकास कशाळकर यांचे सुश्राव्य गायन होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तापी एज्युकेशने सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक असतील. कार्यशाळेत सहभागाचे आवाहन प्राचार्य, उपप्राचार्य व संगीत विभागातर्फे करण्यात आले आहे.