मुंबई:- खान्देशातील महत्वाचे जंक्शन असलेल्या भुसावळ शहरातील मुख्य बसस्थानकाची अवस्था अत्यंत बेकार झाली आहे. बसस्थानकातील खड्ड्यांमुळे नागरिकांना आणि बसचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासंबंधी या खड्ड्यांची दुरुस्ती करावी तसेच बसस्थानक शहराच्या बाहेर हलविण्याच्या संदर्भात आमदार संजय सावकारे यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे लक्ष वेधले.
सावकारे यांनी यावेळी बसस्थानकातील खड्ड्याचे वर्णन करून हजारो लोकं या स्थानकात येत असल्याची माहिती दिली. बसस्थानक शहराच्या बाहेर करण्यासंबंधी परिवहन मंत्र्यांकडे बैठक झाली. यावरील कार्यवाही कुठवर आली? असा सवालही त्यांनी केला. तसेच सद्यस्थितीत बसस्थानकात असलेले खड्डे तात्काळ दुरुस्त करण्यासबंधी व्यवस्था करावी अशीही मागणी केली.