भुसावळच्या रेल्वे पेन्शन अदालतीत 22 खटल्यांचा निपटारा

0

भुसावळ- रेल्वेच्या डीआरएम कार्यालयात मंगळवारी ऑल इंडीया पेन्शन अदालत घेण्यात आली. अदालतीत 22 प्रकरणांचा निपटारा झाला. त्यामुळे संबंधित निवृत्तांना सात लाख 19 हजार 992 रुपयांचे धनादेश देण्यात आले. डीआरएम आर.के. यादव पेन्शन अदालतीच्या अध्यक्षस्थानी होते. अदालतीत 160 खटले ठेवण्यात आले होते. यातील 12 अर्ज हे मुख्यालय व मंडळाच्या अन्य विभागांशी संबंधित असल्याने त्यांच्याकडे पाठवण्यात आले. डीआरएम यादव, एडीआरएम मनोज सिन्हा, वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन.डी. गांगुर्डे आणि कार्मिक विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थित होते.