भुसावळसह दीपनगरात वीज कर्मचार्‍यांची निदर्शने

0

दिवसभर कर्मचार्‍यांचा लाक्षणिक संप ; कामकाजावर परीणाम

भुसावळ : महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या वीज कंपन्यांमध्ये काम करणारे 86 हजार अधिकारी, कर्मचारी व अभियंते यांचे नेतृत्व करणार्‍या सहा प्रमुख संघटनांच्या कृती समितीने 7 जानेवारी रोजी एक दिवसीय संपाची हाक दिल्यानंतर त्यात भुसावसळ दीपनगरातील कर्मचारी सहभागी झाल्याने दिवसभर कामकाज ठप्प पडले तर भुसावळातील तापी नगरातील वीज कंपनीच्या कार्यालयाबाहेर कर्मचार्‍यांनी शासनाच्या खाजगीकरण धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

या मागण्यांसाठी लाक्षणिक संप
महानिर्मिती कंपनीचे 210 मेगावॅटचे संच बंद करण्याचे धोरण तकाळ थांबवावे, महाराष्ट्र शासनाच्या जुन्या पेन्शन योजनेच्या धर्तीवर तिन्ही कंपन्यातील कामगारांना पेन्शन योजना लागू करणे, तिनही कंपनीतील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावे, तिनही कंपनीतील बदली धोरणाच्या पुर्नविचार संघटनांसोबत चर्चा करून राबविण्यात यावा, तिनही कंपनीतील कंत्राटी व आऊट सोर्स कर्मचा-याना टप्या टप्याने कायम कामगार म्हणून सामावून घ्यावे आदींसह विविध मागण्यांसाठी वीज कर्मचारी-अभियंता संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने विविध मागण्यांसाठी सोमवारी एक दिवशीय संप पुकारण्यात आला. महावितरण कंपनीकडून विभागातील जामनेर, पहुर तसेच ग्रामीण भागांतील सर्व अधिकारी व कर्मचारी संपात सहभागी झाले होते. संपामध्ये रवींद्र गायकवाड, निलेश बारी, अशोक भिरूड, मुकेश कोल्हे,नितीन चौधरी आदिंसह अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

दीपनगरातही निदर्शने
दीपनगरातील संयुक्त कृती समितीतर्फेही निदर्शने करण्यात आली तर या संपाला अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शवला. या संपात एम.डी.पाटील, अरुण दामोधर, आनंद जाधव, भरत पाटील, मनोज मोरे, अनिल लाड, अतुल पवार, अरुण शिंदे व विविध युनियन प्रतिनिधी सहभागी झाले.