भुसावळ : शहरातील वाढत्या दूषित पाण्याच्या तक्रारी लक्षात घेता पालिका प्रशासनाने हतनूर धरणातून आवर्तन सोडण्याबाबत जिल्हाधिकारी प्रशासनाशी पत्रव्यवहार केल्यानंतर एक हजार डे क्युसेस प्रमाणे मंगळवारी सायंकाळपासून हतनूरमधून आवर्तन सोडण्यात आल्यानंतर भुसावळकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे आवर्तन शहरात शनिवारपर्यंत पोहचून रविवारपासून अशुध्द पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सुटलेल्या आवर्तनामुळे आगामी आठवड्यात निर्माण होऊ पाहणार्या संभाव्य टंचाईवरही नियंत्रण मिळण्याची शक्यता आहे शिवाय राष्ट्रवादीसह अन्य पक्षांनी स्थानिक सत्ताधारी तसेच पालिका प्रशासनावर अशुद्ध पाण्यामुळे टिकेचे आसुड ओढले होते हेदेखील विशेष !