भुसावळातील आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा आरोपी कोठडीत

0

भुसावळ- महामानवाविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकून समाजात तेढ निर्माण करणारा आरोपी तिलक छोटू मंट्टू यास मंगळवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शहर पोलिस ठाण्यातील डीबी पथकातील कर्मचार्‍यांचा न्यायालय आवारात कडेकोट बंदोबस्त लावला होता. तिलक याने रविवारी रात्री जातीय वाचक शिवीगाळ करीत भावना दुखावल्या प्रकरणी तिलक यांच्या विरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याप्रकरणी पोलिसांनी तिलक याला अटक करून त्यास मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाच्या परीसरात सहायक फौजदार दत्तात्रय चौधरी, हवालदार साहील तडवी, हवालदार शंकर पाटील, विजय पाटील, संजय बडगुजर यांनी बंदोबस्त राखला.