भुसावळातील एल.एच.बी.वर्कशॉपला मंजुरीसाठी खासदार रक्षा खडसेंचे साकडे

0

रेल्वे बोर्ड चेअरमन अश्‍वनी लोहानींना निवेदन ; नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्यासह अन्य गाड्यांना थांबा देण्याची मागणी

भुसावळ- शहरात 472 कोटी रुपये खर्चून नवीन एलएचबी कोचेससाठी पीओएच वर्कशॉपला रेल्वे बोर्डाची मंजुरी बाकी असल्याने ती तातडीने द्यावी तसेच नवीन रेल्वे गाड्या सुरू कराव्यात तसेच काही गाड्यांना भुसावळ विभागातील स्थानकांवर थांबे द्यावेत तसेच भुसावळ स्थानकावर प्लॅटफार्म अभावी पॅसेंजरचा खोळंबा होत असल्याने नवीन प्लॅटफार्मला मंजुरी द्यावी, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी सोमवारी रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्वनि लोहानी यांचयाकडे लेखी निवेदनाद्वारे केली.

या मागण्यांबाबत रेल्वे प्रशासनाला साकडे
पाचोरा-जामनेर या नॅरोगेज ट्रॅकचे रूपांतर ब्रॉडगेज ट्रॅकमध्ये करावे, सर्व सुविधांनी युक्त नवीन प्रवासी डबे उपलब्ध करून सध्या चालू असलेल्या शटल व्यतिरिक्त एक नवीन फास्ट पॅसेंजर सुरू करावी, भुसावळातील एलएचबी कोचेससाठी पीओएच वर्कशॉप निर्मिती व्हावी यासाठीची मंजुरी रेल्वे बोर्डाकडे प्रलंबित असून तिला परवानगी मिळावी, मुंबई आणि पुणे येथून भुसावळ विभागात प्रवास करणार्‍या प्रवाश्यांची संख्या लक्षणीय असल्याने भुसावळ ते मुंबई सीएसएमटी आणि भुसावळ ते पुणे या दोन कायमस्वरूपी गाड्या सुरू कराव्यात, भुसावळ ते दिल्ली जलद प्रवास होण्यासाठी मुंबई ते दिल्ली व्हाया भुसावळ राजधानी एक्सप्रेस सुरू करावी आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

या गाड्यांना थांब्याची मागणी
मलकापूर, नांदुरा, वरणगाव, रावेर, बोदवड येथील प्रवाश्यांच्या मागणीनुसार 12719/12720 जयपूर हैद्राबाद एक्सप्रेसला मलकापूरला थांबा मिळावा, नांदुरा येथे 12129/12130 पुणे – हावडा, 19025/19026 सुरत-अमरावती, 12843/12844 पुरी अहमदाबाद, 12405/12406 भुसावळ -हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळावा, वरणगावात 12719/12720 जयपूर हैदराबाद या गाडीला थांबा मिळावा, रावेर येथे 12149/12150 सीएसएमटी ते वाराणसी, 12149/12150 पुणे ते दानापूर, 12715/12716 अमृतसर ते नांदेड सचखंड एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळावा, बोदवड येथे 12655/12656 अहमदाबाद चेन्नई नवजीवन एक्सप्रेसला थांबा देण्यासंदर्भात मागणी करण्यात आली. रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्वनि लोहानी यांनी मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्‍वासन दिले.