भुसावळातील कब्रस्तानमधील समस्या सोडवणार -नगराध्यक्ष रमण भोळे

0

भुसावळ- शहरातील मुस्लीम समाजाच्या कब्रस्तानमधील विविध समस्या सोडवण्यासंदर्भात नगराध्यक्ष रमण भोळे यांना साकडे घालण्यात आले. कब्रस्तानातील सर्व समस्या निकाली काढण्याची ग्वाही त्यांनी पाहणी प्रसंगी दिली. मुस्लिम कब्रस्तान कमेटीतर्फे नगराध्यक्ष रमण भोळे यांना कब्रस्तानातील विविध समस्या सांगण्यात आल्या. संरक्षक भिंत, बसण्यासाठी बाके, स्ट्रीट लाईट व प्रवेशद्वाराबाबत समस्या मांडण्यात आल्या, कब्रस्तान कमेटीचे युसूफ भांजा, कबीर बर्तनवाले, गट नेता मुन्ना तेली, नगरसेवक सलीम पिंजरी, हाजी साबीर शेख , नश्या दादा तडवी, एस.युकुरेशी आदी उपस्थित होते.