उद्या परीषदेचे उद्घाटन ; संशोधकांना मिळणार वाव
भुसावळ- के.नारखेडे महाविद्यालयात नॅशनल कॉन्फरन्स ऑन रीसेंट इंटेलिजन्स इन मटेरियल अँड बायोमेडिकल सायन्स या विषयावरती 5 व 6 जानेवारी दोन दिवशीय राष्ट्रीय परीषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीषदेचे उद्घाटन शनिवार, 5 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता होईल. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन पी.व्ही.पाटील असतील. प्रमुख पाहुणे म्हणून बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर असतील. यावेळी संस्थेचे जॉ. सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, सदस्य विकास पाचपांडे, विजय भंगाळे, प्राचार्य डॉ.राम प्रकाश, उपप्राचार्य प्रा.अभय श्रीवास आदी उपस्थित असतील.
पाच राज्यातील 74 संशोधक सहभाग
या ठिकाणी सजीव व पर्यावरणाला पूरक विविध विषयांवर संशोधनावर प्रकाशझोत टाकून पेपर प्रेझेंटेशन सादर केले जाणार आहे. या परीषदेत पाच राज्यातील 74 संशोधक सहभागी होतील. यामध्ये राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्रातील, अमरावती, मुंबई, पुणे, उत्तर महाराष्ट्रातील संशोधक आपले पेपर सादरीकरण करून संशोधनातील नाविण्यता मांडणार आहे या माध्यमातून इतर नवीन संशोधन व संशोधकांना मार्गदर्शन मिळणार आहे. यामध्ये पर्यावरण शास्त्र वनौषधी जैवविविधता जैविक तंत्रज्ञान मटेरीअल सायन्स इत्यादी विषयावरील शोधनिबंध सादर करण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे भरतपूर राजस्थान येथील सोसायटी ऑफ सायन्स अॅण्ड एन्व्हायरमेंट यांच्यातर्फे फेलोशिप आणि अॅवार्ड यावेळी दिले जाणार आहे.