भुसावळातील कोरोनाला अटकावासाठी नोडल अधिकारी नियुक्त

0

भुसावळ : भुसावळात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत् असल्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रांताधिकार्‍यांनी नोडल अधिकारी 10 कंटेन्मेंट झोनसाठी नियुक्त केले आहेत. प्रांताधिकारी कार्यालयात शनिवारी झालेल्या बैठकीत प्रत्येक कंटेन्मेंट झोनमध्ये नोडल अधिकारी नियुक्त करण्यावर चर्चा झाली. कंटेन्मेंट झोनमधून बाहेर पडणार्‍यावर पोलिसांकडून कारवाई होणार आहे शिवाय त्याबाबत प्रशासनही नोंद ठेवणार आहे.

कंटेन्मेंट झोनचे उल्लंघण होत असल्याने निर्णय
शहरात मंगळवारी रात्री अखेर शहरातील 30 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहेत तर यातील सहा जणांचा मृत्यू ओढवला असून 24 पैकी सात रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आता 17 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात कंटेन्मेंट झोन आखून देण्यात आले असलेतरी नागरीक यातून मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्याने कोरोनाचा फैलाव होवू नये या पार्श्‍वभूमीवर प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी अधिकार्‍यांची बैठक घेत कंटेन्मेंट झोन या परीसरात सक्त लक्ष ठेवण्यासाठी थेट नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. हे अधिकारी प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरीक व व्यक्तींचे सर्वेक्षणासह नोंदी ठेवणार आहेत तर कंटन्मेंट झोनमधील सर्व बँका या 17 मे पर्यत बंद ठेवण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत.

असे आहेत नियुक्त अधिकारी
नगर रचनाकार बी.बी.पवार (सिंधी कॉलनी), पालिका लेखाधिकारी सुदर्शनराज शामनानी (भजे गल्ली, जाम मोहल्ला), नगर रचनाकार शुभम आडकर (पंचशील नगर), कनिष्ठ अभियंता विजय तोष्णीवाल (शांती नगर), कर व प्रशासकीय अधिकारी राहूल पाटील (महेश नगर), सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस.यु.कुरेशी (लाल बिल्डींग खडका रोड), तालुका कृषी अधिकारी प्रशांत राहाणे (समता नगर), भूमी अभिलेख उपअधीक्षक व्ही.एम.सोनवणे (इंदीरा नगर), सार्वजनिक बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता पी.यु.ठाकूर (इदगाह खडका रोड), महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे कनिष्ठ अभियंता आर.डी. सांगळे (शनि मंदीर वॉर्ड)