भुसावळातील खडका रोड भागात चोरी

0

भुसावळ- घराचा मागील दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्याने मोबाईलसह एक हजार 500 रुपयांची रक्कम मिळून आठ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना शहरातील रजा नगर, हुस्मानी मज्जीद मागील खडका रोड भागात बुधवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार निकहत सुलताना शेख याकूब (रजा नगर, हुस्मानी मज्जीदच्या मागे, खडका चौफुली) यांच्या फिर्यादीनुसार बुधवारी मध्यरात्री 12 ते 1 दरम्यान चोरट्यांनी घराचा मागील दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चार हजार व तीन हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल तसेच एक हजार 500 रुपयांची रोकड लांबवली. तपास बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संदेश निकम करीत आहेत.