सत्ताधार्यांनी दुर्लक्ष केल्याने लोकप्रतिनिधींना घ्यावी लागली दखल
भुसावळ : शहरातील वर्दळीच्या जामनेर रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडल्याने वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत होता. पालिका प्रशासनासह ढीम्म सत्ताधार्यांकडून कुठलीही हालचाल वा दखल घेतली जात नसल्याने संतप्त नागरीकांसह वाहनधारकांनी आमदार संजय सावकारे यांच्याकडे व्यथा मांडल्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने खड्डे बुजवण्याचे निर्देश दिल्यानंतर शुक्रवारी दुपारी एचडीएफसी बँकेसमोरील खड्ड्यांना मुलामा देण्यात आल्याने वाहनधारकांना मोठाच दिलासा मिळाला.
आमदारांना जमले, सत्ताधार्यांना का नाही ?
भुसावळचे लोकप्रिय आमदार सावकारे यांनी जनभावनांची दखल घेत तातडीने रस्त्यांवरील खड्डे बुजण्यासाठी पुढाकार घेतला मात्र ज्या भाजपाची पालिकेत एकहाती सत्ता आहे त्या सत्ताधार्यांचे या रस्त्यांवरून जाणे-येणे असताना व आमदारांनी त्यांना खड्डे बुजण्यासंदर्भात दखल घेण्याचे निर्देश दिले असताना झालेल्या दिरंगाईमुळेच आमदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने काम करण्याचे निर्देश दिल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला. उपनगराध्यक्ष युवराज लोणारी,सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, नगरसेवक पिंटू कोठारी, किरण कोलते, अॅड.बोधराज चौधरी, किशोर पाटील, सुमित बर्हाटे आदी प्रसंगी उपस्थित होते. दरम्यान, भाजपा पदाधिकार्यांमधील अस्वस्थता मात्र भुसावळकरांसाठी दररोज चर्चेचा विषय ठरत आहे हे नक्की !