भुसावळातील घरफोडी प्रकरणी संशयीतांचा शोध सुरू

0

भुसावळ- जामनेर रोडवरील रघकुल कॉलनीतील रहिवासी आणि रेल्वे सुरक्षा बल आयुक्त कार्यालयातील स्टेनो तिलोतमा रत्नाकर जावळे यांच्या घरातून भर दिवसा चोरट्यांनी 55 हजारांचा ऐवज लांबवला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपासाला वेग दिला असून या भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे शिवाय दिड वर्षांपूर्वी अशाच पद्धत्तीने या भागात घरफोडीचा प्रयत्न झाल्याने त्या गुन्ह्यातील संशयीतही तपासले जात आहेत. माहितगाराने चोरी केल्याचा संशय असून जावळे यांच्या कुंपणातून एका तरुणाला बाहेर उडी मारताना काहींनी पाहिल्याचीदेखील माहिती असून त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.