भुसावळातील चाकू हल्ल्यातील जखमी वृद्धेचा अखेर मृत्यू

0

आरोपीविरुद्ध खुन्हाचा गुन्हा : मृतदेहाचे धुळ्यात इनकॅमेरा शवविच्छेदन

भुसावळ- किरकोळ वादातून शहरातील घोडेपीर बाबा दर्ग्याजवळ 55 वर्षीय वृद्धेवर चाकू हल्ला झाल्याची घटना 6 ऑगस्ट रोजी घडली होती. जखमी वृद्धेचा उपचार दरम्यान मृत्यू झाला तर या प्रकरणी अटकेतील आरोपीविरुद्ध खुनाचे कलम वाढवण्यात आले आहे. मृत वृद्धेचे धुळ्यात इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आहे.

उपचार सुरू असताना वृद्धेचा मृत्यू
सोमवार, 6 ऑगस्ट रोजी संशयीत व्यंकटेश बोथराम पवार यांने शिविगाळ करीत आसयानी निचेनकी भोसले (55, अकोला रेल्वे स्टेशन, अकोला) या वृद्धेच्या पोटात चाकू मारला होता. बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वृद्धेला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले होते मात्र उपचार सुरू असतानाच गुरूवारी सकाळी या वृद्धेचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी अनि निचेनकी भोसले (21, रा.अकोला रेल्वे स्टेशन, अकोला) याच्या तक्रारीवरून संशयीत आरोपी व्यंकटेश बोधराज पवार (25, अंजनगाव, अमरावती) विरुद्ध गुन्हा दाखल होता तर गुरुवारी या गुन्ह्याचे खुनाचे कलम वाढवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तपास बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार करीत आहेत.