भुसावळातील जयगणेश फाउंडेशनच्या नवसाचा गणपती गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात

0

भुसावळ- लहान गणेशमूर्ती आणि भव्य आरास उभारणे हे जय गणेश फाउंडेशन चे दरवर्षी नियोजन असते. त्याचप्रमाणे यावर्षीही नियोजन असून गणेशोत्सवाचे मूळ म्हणजे सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करणे, ज्यामध्ये समाजातील बालके विद्यार्थी, युवक युवती महिला पुरूष आणि ज्येष्ठ नागरीक यांचा सहभाग होईल, असे भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे ज्यामुळे प्रत्येकाला आपल्यातील कलागुणांना सादरीकरण करता येईल. सोमवारी सभामंडप उभारणीसाठी सालाबादाप्रमाणे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमास जयगणेश फाउंडेशन चे समन्वयक अरुण मांडलकर, गणेश फेगडे, संस्थापक उमेश नेमाडे, ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष मुरलीधर पाटील यांच्यासह नवसाचा गणपती उत्सवात सेवा करणारे परीसरातील नागरिक व फौउंडेशनचे सदस्य व ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते.