भुसावळ- शहरातील अयोध्या नगर भागातील हर्षल चव्हाण (24) या तरुणाचा मंगळवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला. या तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केली की घातपाताने त्याचा मृत्यू झाला याबाबत ठोस माहिती मिळू शकली नाही. रेल्वेखाली कुणाचा तरी मृत्यू झाल्याची माहिती लोको पायलटने उप स्टेशन मास्तरांना दिल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत हर्षलच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परीवार आहे. दरम्यान, हर्षलने आत्महत्या नव्हे तर त्याचा घातपाती मृत्यू झाल्याचा आरोप आहे. हर्षलला पोलिस अधिकारी होण्याची इच्छा असल्याने पोलिसाचा गणवेश घालून बुधवारी सायंकाळी त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली.