भुसावळ- शहरातील अयोध्या नगर भागातील हर्षल चव्हाण (24) या तरुणाने मंगळवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास रेल्वेखाली आत्महत्या केली होती तर मुलाचा घातपाती मृत्यू असल्याचा आरोप कुटुंबियांनी केल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणी कसून चौकशी सुरू केली आहे. समजलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अप पवन एक्स्प्रेसच्या चालकाचा जवाब नोंदवला असल्याची माहिती असून मृत्यूपूर्वी हर्षलने आपल्या मोठ्या भावाकडून मित्राच्या खात्यावर दोन हजार रुपये मागवल्याची माहिती आहे. या मित्राचीही पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, या प्रकरणाची पोलिसांकडून हर्षलच्या दिनचर्येनुसार चौकशी सुरू असल्याची माहिती बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांनी दिली.