भुसावळ – शहरातील नाहाटा चौफुलीजवळील गो-शाळेजवळ जुन्या वादातून दर्शन ठाकूर या तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची घटना मंगळवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास घडल्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. बुधवारी सायंकाळी दोघा आरोपींना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. हनीशखान उर्फ गोलू व शे.अरबाज शेख बशीर (दोन्ही रा.दिनदयाल नगर, भुसावळ) अशी अटकेतील मुख्य आरोपींची नावे आहेत. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय नरवाडे, एएसआय आनंदसिंग पाटील, एएसआय अंबादास पाथरवट, प्रशातं चव्हाण, विकास सातदिवे, योगेश माळी, उमाकांत पाटील, बंटी कापडणे, संजय भदाणे आदींना आरोपींना अटक केली.