भुसावळातील तरुणावर चाकू हल्ला ः दोघा आरोपींना पोलीस कोठडी

0

भुसावळ- नाहाटा चौफुलीजवळील गो-शाळेजवळ जुन्या वादातून दर्शन सुरेश ठाकूर (वय 22, रा. नेब कॉलनी, भुसावळ) यांच्यावर दोघांनी चाकू हल्ला केला. ही घटना मंगळवारी दुपारी घडल्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना शनिवार, 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू जप्त करण्यात आला. नेब कॉलनीतील रहिवासी दर्शन ठाकूर यांच्याशी नाहाटा कॉलेज जवळील गो-शाळेजवळ संशयीत गोलू उर्फ दानिश व त्याच्या सोबतच्या एकाने वाद घालत ठाकूर याच्या डाव्या दंडावर चाकू मारून दुखापत केली. या प्रकरणी दानीशखान शरीफ खान व शे.आवाज शे.शब्बीर यांना अटक करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय नरवाडे व सहकारी करीत आहेत.