भुसावळातील दोन तर धुळ्यातील 18 उपद्रवी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार

0

पोलिस अधीक्षकांचे आदेश ; अमळनेरसह पारोळा व मालेगाव तालुक्यातही बंदी

भुसावळ/धुळे- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर धुळे जिल्ह्यातील 18 उपद्रवींना दोन वर्षांसाठी धुळे जिल्ह्यातून हद्दपार करण्यासंदर्भातील आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे यांनी मंगळवारी सायंकाळी काढले आहेत. महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये असलेल्या अधिकाराचा वापर करून धुळ्यातील तीन टोळीतील 18 सदस्यांना हद्दपार करण्यात आले. धुळ्यातील देवपूर तसेच आझादनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या उपद्रवींवर कारवाईबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांनी या प्रस्तावाची सविस्तर चौकशी केल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी मंगळवारी सायंकाळी हा निर्णय जाहीर केला. या उपद्रवींना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर व पारोळा तसेच नाशिक तालुक्यातील मालेगाव कार्यक्षेत्रातही प्रवेशास बंदी घालण्यात आली असून बुधवारपर्यंत या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

18 सदस्यांच्या हद्दपारीचे आदेश
हद्दपार झालेल्यांमध्ये नरेश कांतीला गवळी (23, नगावबारी), मुकेश राधेश्याम यादव (ग.नं.7, देवपूर, धुळे), विशाल उमेश पाटील (ग.द.माळी हौसिंग सोसायटी, धुळे), रोहित रवीकांत सानप (विघ्नहर्ता कॉलनी, धुळे), राहुल प्रभाकर ढोले (नगाव बारी, धुळे), प्रफुल्ल दिनकर भोेई (नगाव बारी, धुळे), तुषार काशीनाथ पाटील (नगाव बारी, धुळे), सागर प्रकाश पाटील (आकाशवाणी केंद्राजवळ, देवपूर, धुळे), सनी अनिल सानप (प्रोफेसर कॉलनी, देवपूर, धुळे), आकाश उमेश पानथरी (देवपूर, धुळे), अश्रय श्रावण साळवे, सनी उर्फ सन्या मधुकर साळवे, राहुल मधुकर साळवे, सिद्धार्थ उर्फ पुक्या दिलीप साळवे, जयेश उर्फ जिभ्या रवींद्र खरात, सनी आबा जाधव, आकाश दत्तू साळवे, मनीष श्रावण साळवे (गायकवाड चौक, जुने धुळे) यांचा समावेश आहे. दरम्यान, हद्दपारीच्या आदेशानंतर संबंधीत शहरात दिल्यास तातडीने नियंत्रण कक्ष वा नजीकच्या पोलिस ठाण्यांना सूचित करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

भुसावळातील दोन उपद्रवी हद्दपार
भुसावळ शहरातील निखील सुरेश राजपूत (26, श्रीराम नगर, भुसावळ) व अमोल काशीनाथ राणे (22, भुसावळ) यांनाही हद्दपार करण्यात आले आहे.