भुसावळ : नवशक्ति आर्केडमधील ते वादग्रस्त बांधकाम पाडण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी 30 डिसेंबर रोजी दिले आहेत. गणेश बोरे यांनी या बांधकामासंदर्भात तक्रार केली होती. राजू शर्मा यांनी अतिक्रमण करून जागा बळकावल्याचा आरोप करण्यात आला होता. शौचालयाच्या जागी गाळा उभारण्यात आला असून गेल्या काही महिन्यांपासून बोरे यांचा बांधकाम पाडण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.