भुसावळातील नुपूर कथक अ‍ॅकेडमीतर्फे नृत्य दिन उत्साहात

भुसावळ : जागतिक नृत्य दिनानिमित्ताने भुसावळातील नुपूर कथक डान्स अ‍ॅकेडमीच्या वतीने अखंड घुंगरुनाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी एक तास घुंगरु नाद केला.

यांचा नृत्याविष्कारात सहभाग
नृत्यशिक्षिका चारु भालेराव यांच्यासह कनिका नेमाडे, मन्विथा थोटा, लतिका श्रीखंडे, गिरीजा सावदेकर, मनिषिका आरुषी, चेतना नेमाडे, ज्ञानेश्वरी नेमाडे, सीमा पाठक, अवनी धाडसे, नुपूर भालेराव , चंद्रजा इंगळे, अनघा वानखेडे, डिंपल गाढे, उर्वशी कोळी, शान्वी तन्नीरवार, हेमांगी पंडागरे, पुजा तन्नीरवार, निलम धाडसे, पूर्वा नेवे यांनी सहभाग घेतला. यावेळी सामुदायीक नटराज पूजन करण्यात आले.