निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल : आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी
खिर्डी : खिर्डी येथील तत्पर फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष गुणवंत पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भ्रमणध्वनी 8959075592 या अनोळखी क्रमांकावरून एसएमएसद्वारे 90 दिवसात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे तसेच हा माथेफिरू आरोपीने आपले नाव जळगाव येथील राजेंद्र आर.पवार (व्यंकटेश नगर, जळगाव) असे असल्याचे संदेशात नमूद केले आहे. या प्रकरणी फिर्यादी गुणवंत पाटील यांनी निंभोरा पोलिसांत गुन्हा नोंदविला आहे.
अनेकांना मिळाली यापूर्वी धमकी
काही दिवसांपूर्वी निंभोरा येथील प्रल्हाद बोंडे यांनादेखील याचप्रकारे धमकीचा एसएमएस आला होता मात्र त्यांनी ही निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या माथेफिरूला पोलिसांनी लवकरात लवकर त्याचा तपास घेऊन त्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी फिर्यादीने केली आहे. या बाबत पुढील तपास निंभोरा पोलीस स्टेशन चे सहाय्यक निरीक्षक महेश जानकर यांच्या मार्गदरणाखाली कॉन्स्टेबल अन्वर तडवी करीत आहे.
पोकळ धमक्यांना घाबरत नाही : गुणवंत पाटील
एव्ही गंभीर प्रकारची धमकी येणे याबाबत माझा, गावात, तालुक्यात, किंवा जिल्ह्यात असा कोणीही शत्रू नाही परंतु माझ्याकडे काही संघटनात्मक पदे असल्याने माझा एखादा गुप्त शत्रू असल्यास व त्याला माझ्यापासून काही अडचण असल्यास त्यांनी मला प्रत्यक्ष भेटून सांगावे अशा पोकळ धमक्या देऊन माझे मनोबल कमी करण्याचं काम करू नये आणि मी पोकळ धमक्यांना अजिबात घाबरत नाही. मला आलेल्या धमकीचा मी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे व त्या गुन्हेगारास निंभोरा पोलिस शोधून काढतील, असा माझा पोलिस प्रशासनावर विश्वास असल्याचे गुणवंत पाटील यांनी सांगितले.