दलित पँथरचे प्रांताधिकार्यांना निवेदन ; सुभाष लोखंडेचे काम गौरवास्पद
भुसावळ (प्रतिनिधी)- पंचायत समितीचे पाणीपुरवठा अभियंता सुभाष लोखंडे यांच्यावर कारवाई झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दलित पँथरने प्रांताधिकार्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. लोखंडे यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. कंडारी गावामध्ये पाणीटंचाई असतांना टँकरने सतत पाणी पुरविले, गावामध्ये पाच बोअरवेलचे काम केले तसेच गावाचे सरपंच, सभासद समाधानी आहे व गावातील नागरीकदेखील समाधानकारक आहे. काही कार्यकर्त्यांनी एक दिवशी धरणे घेवून लोखंडे यांची बदली करणेची मागणी केली. ही अतिशय निंदनीय बाब आहे. कंडारी गाव संवेदनशिल आहे. या ठिकाणी सुभाष लोखंडे यांच्यासारखे दक्ष अधिकारी असणे गरजेचे आहे.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
सुभाष लोखंडे यांच्याविरूध्द कोणतीही कार्यवाही झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी मागणी राष्ट्रीय दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सिध्दार्थ सोनवणे, जिल्हा प्रमुख सुदाम सोनवणे, शहर प्रमुख राजू तायडे, युवा शहराध्यक्ष समाधान सोनवणे आदींनी केले आहे. निवेदनावर सिध्दार्थ सोनवणे, अनिल इंगळे, शेख ईमरान शेख सलीम, शेख समीर शेख सलीम, समाधान सोनवणे, सुदाम सोनवणे, विलास कुटे आदींनी दिला आहे.