16 ते 23 जानेवारीदरम्यान ‘अध्ययनातून कौशल्य विकासा’वर व्याख्याने
भुसावळ- भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात भूगोलशास्त्र मंडळातर्फे भूगोल सप्ताह 16 ते 23 जानेवारी या कालावधीत सकाळी 10 वाजता भूगोल अध्ययनातून कौशल्य विकास या विषयावर व्याख्याने व कार्यशाळा होणार आहे. 16 जानेवारी रोजी कै. उपप्राचार्य प्रा.सी.सी.कोल्हे स्मृती दिवस व भूगोल सप्ताहाचे उद्घाटन होईल. उद्घाटक प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मंगला साबद्रा असतील. अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक असतील. विशेष उपस्थिती ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मीमनाक्षी वायकोळे तसेच उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील हे असतील.
या विषयांवर होणार व्याख्याने
16 रोजी प्राचार्य डॉ.मंगला साबद्रा यांचे ‘उच्च शिक्षण दिशा स्थिती आणि विकासाभिमुखता’ या विषयावर व्याख्यान होईल तर 17 जानेवारी रोजी ‘भूसर्वेक्षण आणि रोजगार संधी’ या विषयावर जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयातील भूगोल विभागातील प्रा.डॉ.एस.एन.भारंबे यांचे व्याख्यान होणार आहे. 18 रोजी वांजोळा या गावी भौगोलिक ज्ञान, पीक, नियोजन आणि अर्थकारण या विषयावर नाहाटा महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.ए.डी.गोस्वामी तसेच प्रा.व्ही.डी.पाटील आणि प्रा.व्ही.पी.लढे यांचे व्याख्यान व शेती विषयक कार्यशाळा होईल. 19 जानेवारी रोजी भूगोल विभागातून आजपर्यंत शिक्षण घेऊन बाहेर विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा व गटचर्चा तसेच याचवेळी रांगोळी व पोस्टर स्पर्धा होईल. या प्रसंगी दादासाहेब देविदास भोळे महाविद्यालयातील भूगोल विभागप्रमुख प्रा.आर.डी.भोळे तर अध्यक्षस्थानी महाविद्यालायाचे उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे हे असतील. प्रमुख उपस्थिती महाविद्यालयातील वाणिज्य विभागप्रमुख प्रा.व्ही.जी.कोचुरे आणि कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.महेश सरोदे हे असतील. 20 रोजी पदवी व पदवीत्तर विद्यार्थ्यांकरीता सेमिनार होणार असून यात विभागातील 25 विद्यार्थी सहभागी होतील. हे सेमिनार प्रा.अजय तायडे, प्रा.अविनाश साळुंखे, प्रा.उषा कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली होईल. 21 जानेवारी ‘भूगोल व जैव विविधता’ या विषयावर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा.डॉ.विद्या पाटील यांचे व्याख्यान होईल. प्रमुख उपस्थिती महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डी.के. हिवराळे असतील. 23 रोजी बक्षीस वितरण व भूगोल सप्ताहाचा समारोप होईल.
समारोपाला यांची राहणार उपस्थिती
ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माननीय महेश फालक आणि ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सचिव विष्णू चौधरी यांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बर्हाटे असतील. यावेळी ‘भौगोलिक ज्ञान व पर्यावरण संवर्धन’ या विषयावर श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयाच्या भूगोल विभागातील प्रा.एस.एन.पाटील यांचे व्याख्यान होईल.
यांचे यशस्वितेसाठी परीश्रम
संपूर्ण सप्ताह प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख प्रा.व्ही.पी.लढे, प्रा.अजय तायडे, प्रा.अविनाश साळुंखे, प्रा.उषा कोळी, प्रवीण पवार, विद्यार्थी सचिव शुभम पाटील परीश्रम घेत आहेत. हा संपूर्ण भूगोल सप्ताहाचा कार्यक्रम महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांसाठी आणि प्राध्यापकांसाठी तसेच भुसावळ परिसरातील नागरीकांसाठी खुला असून उपस्थितीचे आवाहन भूगोल सप्ताह समन्वयक प्रा.प्रशांत पाटील, सहसमन्वयक प्रा.अजय तायडे यांनी केले आहे.