भुसावळ- जामनेर रोडवरील डीवायएसपी कार्यालयापासून काही अंतरावर सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकून तीन आरोपींना अटक करण्यात आली. पत्ते, सात हजार 10 रुपयांच्या रोकडसह पत्ते व जुगाराची साधने जप्त करण्यात आली. डीवायएसपी गजानन राठोड यांनी स्वतः पथकासही ही कारवाई गुरूवारी रात्री सव्वाआठ वाजता केली. भागवत विठ्ठल बढे, मिलिंद गोरवाडकर व किशोर पाचपांडे यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.