भुसावळ- शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरदरम्यान महिला उद्योजक मेळाव्याचे शहरातील ब्राह्मण संघात आयोजन करण्यात आले आहे. दीपावलीनिमित्त महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने दरवर्षी प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे या उद्योजक मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यात वेगवेगळे स्टॉल लावले जाणार असून त्यात महिलांनी स्वतः बनवलेल्या साहित्याची विक्री होणार आहे.
उद्योजक मेळाव्याला भेट देण्याचे आवाहन
दिवाळीचे फराळ, दिवाळी डेकोरेशन, आकर्षक दिवे, ज्वेलरी, वेगवेगळ्या प्रकारचे पापड, सौंदर्य प्रसाधने, वेगवेगळे गिफ्ट्स आयटम व साडी, रेडीमेड कपडे, ड्रेस मटेरीयल त्याच बरोबर खान्देशी मेजवानी व चवीष्ट नाश्त्याचे पदार्थ अशा प्रकारची स्टॉल लावण्यात येणार आहेत. शहरातील नागरीकांसह महिलावर्गासाठी हे प्रदर्शन सकाळी दहा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ब्राह्मण संघात विनामूल्य खुले राहणार आहे. सर्वांनी या महिला उद्योजक मेळाव्याला भेट देवून महिलांना आर्थिक पाठबळ द्यावे, असे आवाहन आयोजक प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी केले आहे.