एकाच दिवसात 130 टॅ्रक्टर कचर्याची झाली वाहतूक
भुसावळ- शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील नालेसफाईची मागणी नगरसेविका मीनाक्षी धांडे व सामाजिक कार्यक्रर्ते नितीन धांडे यांनी नगराध्यक्ष व पालिका प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार गुरूवारी या प्रभागातील नाले सफाईला प्राधान्य देण्यात आल्याने या प्रभागातील नागरीकांना दिलासा मिळाला आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केरकचरा साचला होता. परीणामी पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याने दुर्गंधी सुटून या भागातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत होता. या संदर्भात प्रभागातील जनाधारच्या नगरसेविका मीनाक्षी नितीन धांडे व सामाजिक कार्यकर्ते नितीन धांडे यांनी नगराध्यक्ष रमण भोळे व पालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी केली होती. यामुळे गुरूवारी या प्रभागात एक पोकलँड व 20 ट्रॅक्टरच्या सहाय्याने नालेसफाईला सुरूवात झाली. या प्रभागातील गंगारात प्लॉट, पंचशील नगर, कोलते गल्ली आदी भागातून दिवसभरात किमान 130 ट्रॅक्टरच्या ट्रीपा झाल्याने या भागातील रहीवाशांना दिलासा मिळाल्याचे सामाजिक कार्यकर्ते नितीन धांडे यांनी सांगितले.
यांनीही दिला होता आंदोलनाचा इशारा
शहरातील पंचशील नगर, गंगाराम प्लॉट भागातील गौसिया नगर, काझी प्लॉट आदी भागातील नालेसफाईच्या मागणीसाठी राजू डोंगरदिवे यांनी पालिका प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. याचीही पालिका प्रशासनाने दखल घेतल्याचे राजु डोंगरदिवे यांनी निवेदनाद्वारे कळवले आहे.