भुसावळ- शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील लाभार्थींना प्रधानमंत्री जनआरोग्य आयुष्यमान भारत आरोग्य गोल्ड कार्डचे वाटप प्रभागाच्या नगरसेविका मीनाक्षी नितीन धांडे व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
पाच लाखांपर्यंत मोफत उपचार
प्रसंगी मीनाक्षी धांडे म्हणाल्या की, गरीबांना उपचारासाठी आर्थिक पाठबळ न मिळाल्यास अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो तर कधी-कधी तर त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. या गोष्टीची जाणीव ठेवून शासनाने जनआरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अनुषंगाने विविध आजारांवर शस्त्रक्रिया तसेच उपचारासाठी पाच लाखांपर्यंत मदत मिळणार आहे. प्रसंगी प्रभागातील 800 नागरीकांना या योजनेचा लाभ मिळाला.