फैजपूर : भरधाव दुचाकीवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात भुसावळातील प्रौढ दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विजय जनार्दन पाटील (49, के.पी. क्लब, दत्त मंदिर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.
दुचाकी अपघातात मृत्यू
विजय पाटील हे मंगळवार, 5 रोजी मध्यरात्री 12.30 ते 1 वाजेच्या सुमारास दुचाकी (क्रमांक एम.एच. 19 ए.सी.1922) व्दारे फैजपूरकडून भुसावळकडे जात असताना पिंपरूळ रोडवर टीव्हीएस शो रूमजवळ भरधाव दुचाकीवरील त्यांचा ताबा सुटल्याने दुचाकी रोडच्या बाजूला असलेल्या चारीतील झुडूपात शिरल्याने विजय पाटील त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत दुचाकीवरील ताबा सुटल्याने विजय पाटील हे स्वतःच्या मरणास कारणीभूत ठरल्या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार रवींद्र मोरे करीत आहे.