भुसावळातील पोलीस कर्मचारी मालेगावात पॉझिटिव्ह

0

जळगाव : मालेगावात बंदोबस्तासाठी गेलेल्या भुसावळातील बाजारपेठ पोलिस ठाण्याचा कर्मचार्‍याला कोरोनाची लागण झाली असुन त्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पुढील उपचारार्थ त्याला नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोरोनाची लागण झालेल्या कर्मचार्‍यांची संख्या झाली दोन

१३ एप्रिल पासुन हा कर्मचारी मालेगावात रमजान पोलीस स्टेशन हद्दीत अक्सा कॉलनीत येथे बंदोबस्तावर होता. १ मे पासुन एकात्मता चौक येथे बंदोबस्तासाठी त्याला नियुक्त करण्यात आले . यादरम्यान त्याला लक्षणे आढळुन आल्याने तपासणीसाठी त्याचा नमुने पाठविण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाला असुन तो कोरोनाबाधीत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान जिल्ह्यातून मालेगावात बंदोबस्तादरम्यान कोरोनाची लागण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या आता दोन झाली आहे .याला अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी दुजोरा दिला आहे.

१०० कर्मचारी कोरोनाबाधीताच्या संपर्कात

बंदोबस्तासाठी गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील १०० पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था मालेगावातील सोयगाव येथील ऐश्वर्या मंगल कार्यालयात करण्यात आले आहे . हे सर्व कर्मचारी संबंधित कोरोबाधीत कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेले असून त्यांचेही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात यावे व त्यांना क्वारंटाइन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.