भुसावळातील बेरोजगारांचे अतिक्रमण तुटले तेव्हा कुठे होत्या खासदार रक्षा खडसे ?

0

माजी आमदार संतोष चौधरी यांचा सवाल ; निवडणुकीच्या तोंडावर बेरोजगारांची आठवण झाल्याची टिका

भुसावळ- भुसावळातील रेल्वे हद्दीतील गोर-गरीबांचे घरांचे तसेच बेरोजगारांचे अतिक्रमण तुटले तेव्हा खासदार रक्षा खडसे कुठे होत्या ? असा सवाल माजी आमदार संतोष चौधरी यांनी उपस्थित केला. कोथळी येथे रविवारी होत असलेल्या बेरोजगारांच्या मेळाव्याच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार रक्षा खडसे यांना बेरोजगारांची आठवण झाली असून आधी भुसावळातील अतिक्रमितांना रोजगार द्या मगच रोजगार मेळावे भरवा, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला. खासदार रक्षा खडसे या निष्क्रीय असून कोथळीकरांना आता सरकारसोबत जनतेनेही नाकारल्याचे माजी आमदार चौधरी म्हणाले.