भुसावळ- शहरातील भारत नगराजवळील रेल्वे लाईनीवर अज्ञात इसमाचे लिंग आढळल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी पंचनामा करून हे लिंग प्रयोगशाळेत डीएनए तपासणीसाठी पाठवले आहे. दरम्यान, कलिम शहा नामक व्यक्तीचे हे लिंग असून रविवारी रात्री दोन संशयीतांनी त्यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले व ते न दिल्याने आरोपींनी शहा यांचे लिंग छाटल्याची माहिती पुढे आली असून शहा यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.