भुसावळ : शहरातील कडू प्लॉट भागात मंगळवारी एकावर चाकू हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी शहरातील महात्मा फुले नगरात एकावर दगड व विटांनी तसेच फायटरने सात जणांनी हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. रात्री उशिरा जखमीला जळगावातील एका खाजगी दवाखान्यात उपचारार्थ हलवण्यात आले. सौरभ कुटे असे जखमीचे नाव असल्याचे समजते तर आरोपींनी दगड, विटा तसेच फायटरचा हल्ल्यासाठी वापर केल्याचे समजते. रात्री उशिरा हल्याची माहिती कळताच स्वतः डीवायएसपी गजानन राठोड व अन्य दुय्यम अधिकार्यांनी धाव घेत माहिती जाणून घेतली. शहरात 24 तासात दोन अप्रिय घटना घडल्याने जनतेत भीती पसरली असून गुन्हेगारी प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी पुढे आली आहे.