भुसावळातील माजी नगरसेवक दिनेश जोगदंड यांचे हृदयविकाराने निधन

भुसावळ : शहरातील रेल्वे दवाखान्यामागील डॉ.आंबेडकर नगरातील रहिवासी व माजी नगरसेवक दिनेश उर्फ लड्डू जगन्नाथ जोगदंड (55) यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराने घराजवळच निधन झाले. या प्रकरणी शहर पोलिसात विद्यानंद जगन्नाथ जोगदंड यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत जोगदंड यांच्या पश्चात आई, मोठा भाऊ, वहिनी असा परीवार आहे. दरम्यान, अत्यंत मितभाषी व सर्वांच्या सुख-दुखाःत सहभागी होणार्‍या दिनेश जोगदंड यांच्या अकाली निधनाने शहरातील सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली.