57 वर्षांनी काँक्रिटीकरण : माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या हस्ते भूमिपूजन
भुसावळ- शहरातील मामाजी टॉकीज रस्त्याच्या ट्रीमीक्स कामाचा शुभारंभ रविवार, 5 रोजी सायंकाळी पाच वाजता होत आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते रस्ता कामाचे भूमिपूजन होणार आहे. तब्बल 57 वर्षांनी रस्त्याचे काँक्रिटीकरण होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची वाताहत झाल्याने शहरवासीयांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. ट्रीमीक्स पद्धत्तीच्या कामामुळे किमान 40 वर्ष या रस्त्यावर डांबरीकरण राहणार असल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे. या कार्यक्रमास आमदार संजय सावकारे यांच्यासह नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष रमण भोळे यांनी केले आहे.