भुसावळातील मामाजी टॉकीज रस्त्याचे अखेर भाग्य उजळले

0

माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या हस्ते भूमिपूजन

भुसावळ- शहरातील मामाजी टॉकीज रस्त्याच्या ट्रीमीक्स कामाचा शुभारंभ रविवार, 5 रोजी सायंकाळी सहा वाजता माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याहस्ते भूमिपूजनाने करण्यात आला. तब्बल 57 वर्षांनी रस्त्याचे भाग्य उजळल्याने शहरवासीयांसह नागरीकांनी समाधान व्यक्त केले. ट्रीमीक्स पद्धत्तीच्या कामामुळे किमान 40 वर्ष या रस्त्यावर डांबरीकरण राहणार असल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, या भागातील वाहतूक नाहाटा चौफुलीमार्गे वळवण्यात येणार असून त्या संदर्भात स्थानिक आगार प्रशासनाला तसेच पोलीस प्रशासनाला पत्रही देण्यात आले असून सोमवारी नगराध्यक्ष या संदर्भात उभयंतांशी चर्चा करणार असून त्यानंतर लागलीच प्रत्यक्षात ट्रीमीक्स कामाला सुरुवात होणार असल्याचे नगराध्यक्ष म्हणाले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमास आमदार संजय सावकारे यांच्यासह नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, नगरसेवक युवराज लोणारी, राजेंद्र नाटकर, परीक्षीत बर्‍हाटे, किरण कोलते, महेंद्रसिंग ठाकूर, रमेश नागराणी, देवा वाणी, निक्की बत्रा, पुरूषोत्तम नारखेडे, वसंत पाटील, राजू खरारे, रमाशंकर दुबे, पवन बुंदेले यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी ढोल-ताशांच्या गजरात जोरदार आतषबाजी करण्यात आली तर कार्यक्रम संपेपर्यंत वाहतूक काही वेळ थांबवण्यात आली होती.