शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचा उपक्रम ; स्वच्छता न राखणार्यांना तंबी
भुसावळ- दिवाळीसारख्या सणात बनावट व भेसळयुक्त खाद्य पदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असताना अन्न व औषध प्रशासनाकडून दुकानांची तपासणी न झाल्याने शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख देवेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात भुसावळ प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन देण्यात आले होते मात्र त्यानंतरही प्रत्यक्षात कृती न झाल्याने मंगळवार, 6 रोजी शहरातील मिष्ठान्न व खाद्यपदार्थ कारखान्यांची पाहणी करण्यात आली. ग्राहक संरक्षण कक्षातर्फे स्वच्छता ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या.
भेसळ माफियांवर वचक बसावी म्हणून पाहणी
भुसावळ तालुक्यातील विविध खाद्यपदार्थ विक्रेते, भेसळ माफियांवर वचक बसवण्यासाठी शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे पाहणी करण्यात आली. बुधवारीदेखील भुसावळातील अन्य ठिकाणी ग्राहक संरक्षण कक्षातर्फे पाहणी करण्यात येणार आहे, असे तालुका प्रमुख देवेंद्र पाटील यांनी कळवले आहे. प्रसंगी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हा प्रमुख नितीन देशमुख, तालुका प्रमुख देवेंद्र पाटील, शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, महिला आघाडी शहर संघटिका भुराबाई चव्हाण, शहर संघटक योगेश बागुल, उपशहर संघटक सोनी ठाकूर, तालुका युवा अधिकारी हेमंत बर्हाटे, शहर युवा अधिकारी सुरज पाटील, विक्की चव्हाण उपस्थित होते.