A Bike ride through Mohit Nagar in Bhusawal भुसावळ : शहरातील मोहित नगर भागातून 75 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय
तक्रारदार सागर सुरेश कुंभार (30, मोहित नगर, राधाकृष्ण कॉलनी, विटभट्टीजवळ, भुसावळ) यांनी त्यांची दुचाकी (एम.एच.19 डी.डब्ल्यू.8957) ही घरासमोर लावल्यानंतर चोरट्याने 26 रोजी रात्री 10.30 ते 27 रोजीच्या सकाळी सात वाजेदरम्यान संधी साधून दुचाकी लांबवली. तपास हवालदार रईस शेख करीत आहेत. दरम्यान, शहरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरीचे सत्र सुरू असतानाही पोलिस प्रशासनाला चोरट्यांना पकडण्यात यश आले नसल्याने वाहनधारक धास्तावले आहेत.