दुसर्यांदा चोरी ः हजारो रुपयांचे साहित्य लंपास
भुसावळ- शहरातील गजबजलेल्या रेल्वे लोखंडी पुलाला लागून असलेले व बाजारपेठ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देवडा रेडिमेड स्टोअर्समधून चोरट्यांनी हजारो रुपयांची साहित्य लांबवल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्याने व्यापार्यांमध्ये खळबळ उडाली. वर्षभरात दुसर्यांदा ही चोरी झाली हे विशेष !
दुकानाचा पत्रा उचवकून केली चोरी
संदीप देवडा यांच्या मालकीचे हे दुकान असून चोरट्यांनी दुकानाचा पत्रा लोखंडी टॉमीने उचकावून दुकानातील रेनकोट, बनियन, अंडरपँट, पायजमा आदी साहित्य लांबवल्याचे देवडा ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना म्हणाले. सुमारे 40 हजारांपर्यंतचे साहित्य लांबवण्यात आल्याचा अंदाज असून शहर पोलिसांनी चोरीची माहिती मिळाल्यानंतर भेट दिली.