भुसावळातील लग्नातून दागिने लांबवले : अट्टल चोरटा जाळ्यात
भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कामगिरी : अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
भुसावळ : भुसावळात लग्नात वर्हाडी बनून दागिण्यांची चोरी करणार्या अट्टल चोरट्यास भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने अशाच पद्धत्तीने अनेक चोर्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीच्या ताब्यातून एक लाख 70 हजारांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. राहुल वासुदेव भामरे (37, साईनगर, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 12 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
लग्नातून लांबवले होते दागिने
भुसावळ शहरातील बालाजी लॉनमध्ये 28 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या विवाह समारंभात तक्रारदार विनायक शिवाजी दराडे (30, साईकिरण अपार्टमेंट, वायलेनगर, खडकपाडा, कल्याण) यांच्या पत्नीची खोली क्रमांक पाचमधून पर्स लांबवण्यात आली होती. या पर्समध्ये एक लाख 10 हजार 754 रुपयांचे 32 ग्रॅम सोन्याचे दागिने व अन्य साक्षीदार यांची सात हजारांची रोकड चोरीला गेली होती. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी बालाजी लॉन परीसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली होती तसेच रेकॉर्डवरील संशयीतांची चाचपणी केल्यानंतर गोपनीय माहितीवरून आरोपी राहुल भामरे (जळगाव) याच्या मुसक्या आवळल्या.
गोपनीय माहितीवरून आरोपी जाळ्यात
आरोपी राहुल भामरे याला बुधवार, 8 डिसेंबर रोजी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडीत आरोपीने चोरलेले दागिने जळगावच्या रतनलाल सी.बाफना ज्वेलर्समध्ये मोडल्याची कबुली दिल्यानंतर एक लाख 14 हजार 446 रुपयांची लगड जप्त करण्यात आली तसेच 50 हजार रुपये किंमतीची हिरोहोंडा दुचाकी (एम.एच.19 बी.एस.7356) तसेच दुचाकीच्या डिक्कीतून पाच हजारांची रोकड जप्त करण्यात आली. आरोपीला पुन्हा शुक्रवार, 10 रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावणयात आली.
आरोपी कुविख्यात : अनेक गुन्हे उघडकीस
आरोपी राहुल भामरे विरोधात दर्यापूर, जि.अमरावती न्यायालयाने घरफोडीच्या गुन्ह्यात वॉरंट काढले असून तो त्यात पसार असल्याची बाब समोर आली आहे तसेच भुसावळ शहर पोलिसात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यातही आरोपी वॉण्टेड आहे. दरम्यान, आरोपीने लग्न समारंभात वर्हाडी बनून जात अनेक चोर्या केल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांनी दिली आहे.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, प्रभारी निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ, हवालदार सुनील जोशी, नाईक विकास सातदिवे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, निलेश चौधरी, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, प्रशांत सोनार, जीवन कापडे, योगेश माळी, परेश बिर्हाडे, चालक दिनेश कापडणे, गुन्हे शाखेचे पोलिस नाईक दीपक पाटील आदींच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या.