एकनाथराव खडसे यांची अटलच्या भूमिपूजनप्रसंगी बॅनरबाजी करणार्या विरोधकांवर टिका
भुसावळ : भुसावळातील विरोधकांनी जलशुद्धीकरण केंद्राच्या प्रवेशद्वारावर योजना आमच्या काळात मंजूर झाली या आशयाचे फलक लावल्यानंतर भाषणात तोच धागा पकडत माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले की, भुसावळातील विरोधकांनी न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची घाई झाली असल्याचे त्यांनी सांगत यापूर्वीच्या सत्ताधार्यांनी योग्य रितीने पैसा खर्च केला नाही तसेच नियेाजन केले नाही त्यामुळे शहराचा विकास खुंटल्याची भावना व्यक्त केली. मी जरी योजना मंजूर केली नसलीतरी या योजनेसाठी खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांनी केलेला पाठपुरावा मोलाचा असल्याचे त्यांनी भाषणातून सांगितले. भुसावळात मांडव घालणारे विरोधक अधिक असल्याची टीकाही त्यांनी केली.