भुसावळ : सोन्याची अंगठी घेण्यासाठी तसेच दुचाकी घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावेत म्हणून शहरातील विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी भुसावळातील पतीसह सात जणांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
सात जणांविरोधात गुन्हा
फरीदा बी.जावेद खान (30, शिवाजी नगर, भुसावळ) या विवाहितेच्या तक्रारीनुसार, पतीसह सासरच्या आरोपींनी सोन्याची अंगठी घेण्यासाठी तसेच दुचाकी घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावेत म्हणून 19 फेबु्रवारी 2022 ते 4 मार्च 2022 दरम्यान छळ केला. आरोपी पतीने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच अन्य आरोपींनी जेवण न देता शिविगाळ करून कु्रर पद्धत्तीने छळ केला.
हे आहेत संशयीत आरोपी
छळ असह्य झाल्याने विवाहितेने बाजारपेठ पोलिस ठाणे गाठून कैफियत सांगितल्यानंतर आरोपी पती जावेद खान ईकबाल खान, सासू मुमताज बी. इकबाल खान, नणंद तबस्सुम बी. इम्रान खान, नणंद मैनाज इकबाल खान, जेठानी रीहाना मुस्ताक खान, जेठ मुस्ताक इकबाल खान, भाची अरसीन सलीम खान (सर्व रा.खडका, ता.भुसावळ) यांच्याविरोधात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक महेश एकनाथ चौधरी करीत आहेत.