मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा ; राहुरी कृषी विद्यापीठाचे लवकरच विभाजन, मेगा रीचार्ज प्रकल्पाला चालणा देणार
भुसावळ- पुलवामा हल्ल्याचा नक्कीच आपले जवान बदला घेतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांना त्याबाबत पूर्ण स्वातंत्र्य दिले जासून शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब घेतला जाईल, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुसावळात रेल्वेच्या अतिक्रमणात विस्थापीत झालेल्यांसह शहरातील बेघरांसाठी राज्य शासन पाच हजार मोफत घरे देणार असल्याची घोषणा केली. राहुरी कृषी विद्यापीठाचे लवकरच विभाजन करून जिल्ह्यातील मेगा रीजार्च प्रकल्पालादेखील चालना देणार असल्याची ग्वाही त्यांनी येथे दिली. खासदार रक्षा खडसे यांच्या ‘समर्पण’ या कार्यवृत्तांताच्या प्रकाशन कार्यक्रमात मुख्यंत्री बोलत होते. आरपीडी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान (डी.एस.ग्राऊंड) वर आयोजित कार्यक्रमात आयुष्यमान भारत योजनेच्या पाच लाभार्थींना गोल्ड कार्डाचे वाटप तसेच सावद्यासह निंभोरा व बोदवड येथील रेल्वे ब्रीजचे ऑनलाईन उद्घाटन तसेच नगरपालिका उद्यानासह प्रशासकीय ईमारतीचे व आमदार निधीतील उद्यानाचे रीमोटद्वारे त्यांनी ऑनलाईन उद्घाटन केले.
या प्रमुख मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती
संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींची व्यासपीठावर उपस्थिती होते.