भुसावळातील शासकीय ठेकेदार विनय बढे यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

0

भुसावळ- बनावट दस्तावेज बनवून शासकीय टेंडर मिळवण्याप्रकरणी शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायीक तथा शासकीय ठेकेदार विनय बढे यांच्याविरुद्ध जळगाव जिल्हा पोलिस ठाण्यात फसवणूक व आयटी अ‍ॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला तर त्यांना या प्रकरणी 25 ऑक्टोबर रोजी अटकदेखील करण्यात आली होती. विनय बढे यांनी जळगाव सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केल्यानंतर तो नाकारण्यात आला होता तर खंडपीठात पुन्हा बडे यांच्यावतीने अ‍ॅड.निर्मल दायमा यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. 10 रोजी या जामिनावर न्या.मंगेश पाटील यांच्या न्यायासनापुढे सुनावली झाल्यानंतर जामीन मूंर करण्यात आला. बढे यांच्याकडून अ‍ॅड.राजेंद्र देशमुख व अ‍ॅड.निर्मल दायमा तर शासनाकडून अ‍ॅड.सोनपावले यांनी काम पाहिले.