भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक 21 चे नगरसेवक रमेश नागराणी व नगरसेविका पुष्पा बतरा यांचा प्रयत्नाने व आमदार संजय सावकारे यांच्या स्थानिक विकास निधीतून शहरातील प्रभाग क्रमांक21 मधील सिंधी कॉलनी भागात आनंदधाम ते छोटा सेवा मंडळापर्यंत पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे उद्घाटन मंगळवार, 9 रोजी आमदार संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचा बाबा हंसकुमार वतवानी यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. आनंदधाम येथे आमदार संजय सावकारे यांचा शाल व पुष्पगुच्छ देउन बाबा हंसकुमार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास माजी नगरसेवक निक्की बतरा, अजय नागराणी, नगरसेवक युवराज लोणारी, गिरीश महाजन, सतीश सपकाळे, बाबा अनिल कुमार, जयपाल नागदेव, दिनेश दोदानी, केशव गेलानी, राहुल मखीजा, दिनेश छाबडीया, जॉनी मेघानी, घनश्याम बतरा, जय तलरेजा, दयावान लालवाणी, जयपाल देसाई, जॅकी धमेचा,न रेश रोहिडा व नागरीक उपस्थित होते.