भुसावळातील 38 वर्षीय विवाहिता बेपत्ता

0
भुसावळ- शहरातील जुना वांजोळा रोडवरील अत्तरदे चाळसमोरील श्रीराम नगरातील रहिवासी जयश्री वसंत नेमाडे (38) या 21 ऑगस्ट रोजी बेपत्ता झाल्या. अंगात निळ्या रंगाची व पिवळी किनार असलेली साडी व डार्क निळ्या रंगाचे ब्लाऊज आहे. विवाहिता हरवल्यासंदर्भात निखील नेमाडे भुसावळ बाजारपेठ पोलिसात हरवल्याची नोंद केली आहे. सदर विवाहिता कुणाला आढळून आल्यास त्यांनी 7276665387 व वसंत नेमाडे 8766564144 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.